प्रणयगंध - प्रकाशित झाला
Submitted by admin on Tue, 05/12/2009 - 22:04
"प्रणयगंध" हा माझा दुसरा संगीतसंच दिनांक ३१ मे, २००९ रोजी मुंबई येथे ज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार पं. यशवंत देव यांच्या हस्ते प्रकाशित झाला. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी डावीकडून : मी स्वत:, पं. यशवंत देव, वैशाली सामंत, अमेय दाते, वैशाली काजरेकर आणि वैभव काजरेकर
- 3 comments
- 1261 reads
स्पर्श चांदण्याचे - माझा पहिला अल्बम
Submitted by विवेक on Wed, 02/11/2009 - 21:38या विभागात सर्व संगीतप्रेमींचं स्वागत
तुमच्या श्रवणासाठी माझा २००५ साली प्रकाशित झालेला "स्पर्श चांदण्याचे" हा मराठी प्रेमगीतांचा अल्बम सादर करताना मला अतिशय आनंद होतो आहे. या संगीतसंचाची पूर्ण निर्मिती ही माझी स्वत:ची असून सर्व महाराष्ट्रात हा संच रसिकांपर्यंत पोचवण्याची व्यवस्था "व्हीनस रेकॉर्डस" या नामांकित कंपनीने स्वीकारली होती.
या संचात गझलसम्राट सुरेश भट, कविवर्य वसंत बापट, ज्येष्ठ गझलकार सदानंद डबीर या नामवंतांच्या रचना आहेत, त्याचप्रमाणे प्रसन्न शेंबेकर, जयश्री अंबासकर आणि तुषार जोशी यांसारख्या नवोदित कवी / कवयित्रीच्या रचनांचा पण समावेश आहे.