अप्रकाशित पु. ल.

भाऊ मराठे एका कार्यक्रमाच्या आधी काही नोंदी करताना

माझा एक मित्र सुप्रसिध्द निवेदक भाऊ मराठे याने प्रचंड मेहेनत घेऊन पुलंची काही भाषणे आणि पुलंच्या घेतल्या गेलेल्या काही मुलाखती ज्या ऑडिओ / व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध होत्या त्यांचं संकलन करुन स्वत:च्या मोत्यासारख्या अक्षरात लिहून काढल्या. त्याने अशी अनेक संकलनं केली आहेत आणि हा असा ठेवा लिखित स्वरुपात त्याच्या स्वत:पुरता उपलब्ध असला तरी तो कायम स्वरुपी जतन व्हावा या उद्देशाने मी त्याला विचारणा केली की त्याचं हे हस्तलिखित स्वरुपातलं संकलन मी टंकलिखित करुन माझ्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देऊ शकतो का ? तेंव्हा भाऊने एका क्षणाचाही विचार न करता त्याची पोतडी माझ्या स्वाधीन केली. हे आपल्या पुढे सादर करताना माझी भूमिका ही केवळ "मी तो हमाल भारवाही" अशीच आहे. टंकलेखनाचं काम जरी माझं असलं तरी या खजिन्याचं संपूर्ण श्रेय भाऊ मराठे कडेच आहे.