गझलनवाज भीमराव पांचाळे यांची प्रदीर्घ मुलाखत
मे, २००९ मधे गझलनवाज भीमराव पांचाळे यांना परत भेटण्याचा योग आला. यापूर्वी एकदा भेट झाली होतीच. पण यावेळी त्यांना माझे स्नेही प्रमोद देव यांच्यामार्फत काजरेकर.डॉट.कॉम साठी एक खास मुलाखात देण्याची गळ घातली. भीमरावांनी लगेच मान्यता दिल्यावर मी व प्रमोद देव यांनी मिळून प्रश्नावली तयार केली आणि मारली धडक थेट भीमरावांच्या बोरिवली येथील निवासस्थानी. भीमरावही इतक्या मोकळेपणाने बोलले की या मुलाखतीला औपचारिक स्वरुप न रहाता एक स्वैर गप्पांचं स्वरुप आलं. श्रेय अर्थातच भीमरावांच्या भरभरुन बोलण्याला. ही प्रदीर्घ मुलाखत १० भागांमधे विभागली आहे.
या मुलाखतीत भीमरावांना बोलतं केलंय देव साहेबांनी आणि ही मुलाखत कॅमेर्यात टिपली आहे अस्मादिकांनी. प्रमोद देव यांचा हा मुलाखत घेण्याचा पहिलाच प्रसंग, पण ते चक्क खोटं बोलताहेत अशी शंका येण्याइतकी सराईतपणे त्यांनी ही मुलाखत घेतली आहे. तर आता पहा आणि तुम्हीच ठरवा. .......................................
- 601 reads