माकडाचा मोबाईल
- कलाकार: Anahita Ponkshe
- शीर्षक: माकडाचा मोबाईल
- Music Director: Vivek Kajarekar
- Year: 2008
- Album: My Compositions
- कालावधी: 0:05:08 minutes (5.65 MB)
- प्रकार: MP3 Stereo 44kHz
माझा मित्र मिलिंद छत्रे याची ओळख होण्याआधी मी त्याच्या ब्लॉगला भेट दिली होती. त्याची विडंबनं तर मला आवडली होतीच (कारण ती नेहेमी मूळ गाण्याच्या मीटर चा आदर राखून केलेली असतात, पण त्याच्या एका मजेशीर बालगीताने मला भुरळ पाडली. त्यामुळे हे गाणं मी स्वरबद्ध करु शकतो का अशी विचारणा करण्याच्या बहाण्याने मिलिंदची ओळख करुन घेतली. आणि बालगीत या एका कठीण संगीत प्रकाराला हात घालायचं ठरवलं. मी स्वरबद्ध केलेलं हे पहिलंच बालगीत. नंतर मायबोली च्या २००८ च्या दिवाळी अंकात त्याला यथोचित स्थान मिळालं.
तसं मुळात हे गाणं अजून लांबलचक होतं, पण संगीतबद्ध करताना त्याला आटोपशीरपणा येण्यासाठी काही कडवी गाळण्यात आली. गाण्याचे शब्द असे आहेत .......
एक माकड घेऊन आले एकदा एक मोबाईल, डिस्प्ले होता कलरफुल आणि लेटेस्ट होती स्टाईल
स्क्रीनसेव्हर त्याचा होता बाल हनुमान,रिंगटोन म्हणून सेट केले जंगलबुकचे गान
माकड म्हणे वापरायचाय का तुम्हाला हा फोन?, एका कॉलला रुपये तीन, एस. एम. एस. ला दोन
दुसर्या जंगलात फोन करायला पडेल ज्यादा दर, रोमिंग तेवढे घेतले नाही, उगाच खर्चात भर
कोल्हा म्हणाला माकडदादा झालोय फार बोअर,एस.एम.एस. करुन मागवा जरा क्रिकेटचा स्कोअर
ससा मागे शर्यतीसाठी एकदाच फोन उधार,अलार्म सेट करुनच झोपेन यंदा मीच जिंकणार
अस्वल म्हणाले वाट बघत असेल माझी हनी, फोन करुन सांगतो आलोच मी काढून ठेव हनी
कुत्रा बोले शेपूट हलवत सांगू का खरंच, 'आयडीआ' का घेतलेस भाऊ, वापरुन बघ ना 'हच'
इतक्यात आले वाघोबा डरकाळी फोडत, पळती सारे सैरावैरा आरडा ओरडा करत
माकड म्हणाले घाबरु नका! पळताय काय असे? युक्ती ऐसी करतो आता वाघोबाही फसे
हळूच त्याने बंदुकीचा 'ठो ठो' रिंगटोन लावला, घाबरुन तेथून वाघोबाने लागलीच पळ काढला
वाघोबाची फजिती पाहून हसु लागला जो तो, माकड म्हणाले नीट बसा काढू छानसा फोटो
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य बना
- 546 reads
- 81 श्रवणे