पत्रामध्ये काय लिहावे

Cover (front)
  • कलाकार: Vivek Kajarekar
  • शीर्षक: पत्रामध्ये काय लिहावे
  • Music Director: Vivek Kajarekar
  • Year: 2008
  • Album: My Compositions
  • कालावधी: 0:04:49 minutes (5.68 MB)
  • प्रकार: MP3 Stereo 44kHz

मायबोली या संकेतस्थळाने २००८ मधे एक स्पर्धात्मक गझल कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात प्रथम पारितोषिक विजेत्या गझलेला संगीतबध्द करुन मायबोलीच्याच २००८ च्या दिवाळी अंकात स्थान देण्यात येईल असं अगोदरच जाहीर करण्यात आलं होतं. या स्पर्धेत प्रसाद मोकाशीच्या गझलेला प्रथम पारितोषिक मिळालं आणि ती गझल संगीतबद्ध करण्याचं काम माझ्याकडे आलं. अत्यंत कमी वेळ हातात होता पण दिवाळी अंक प्रकाशित करण्याची तारीख आधीच जाहिर झाली असल्याने उपलब्ध असलेल्या मर्यादित वेळेत मला ही रचना पूर्ण करावी लागली. ही मूळ गझल अशी आहे .......

कुणास सांगू गीता कृष्णा सुचतच नाही
अर्जुन कोणी लायक येथे दिसतच नाही

कसा पुरावा लपवावा अपुल्या भेटीचा?
श्वासातील प्रणयाचे अत्तर उडतच नाही

या दोघांची गाठ कुणी अन कशी बांधली?
मनामागुनी शरीर दुबळे, पळतच नाही!

पडझड चालू झाली की मी शोधत असतो
भूकंपाचे केंद्र कधीही मिळतच नाही

हास्य होवुनी ओठांवरती येतो , जातो
तो अश्रू जो डोळ्यांमधुनी गळतच नाही

तुझी आठवण; काळजातल्या तुळशीपुढला -
मंद दिवा जो वादळातही विझतच नाही

मिठीत घ्यावे दुःखालाही खुल्या दिलाने
त्याला कोणी सगासोयरा असतच नाही

फक्त लावती अंगारा भक्तीने भाळी..
कुणी उभ्याने उदबत्तीसम जळतच नाही

काय बिनसले तिचे नि माझे, तिलाच ठावे
आरशातली व्यक्ती हल्ली हसतच नाही!

चाल लावण्यासाठी ९ शेरांच्या या गझलेमधले काही शेर निवडणं आवश्यक होतं. साधारण सारख्या मूडचे वाटणारे असे २, ३ व ७ क्रमांकाचे शेर निवडून प्रसादशी संपर्क साधला. पण त्यामुळे मतला (जो निवडलेल्या शेरांच्या मूडशी सुसंगत नव्हता) परत लिहून घेण्याची गरज भासली. तशी मी प्रसादला विचारणा केली. त्यानेही पटकन नवा मतला लिहून दिला तो असा ......
पत्रामधे काय लिहावे कळतच नाही
मेघ दाटला पाण्याने पण झरतच नाही

मग मी वरील मतला आणि मूळ गझलेमधले निवडक ३ शेर असे घेऊन ही रचना बांधली

0
Your rating: None