कार्यारंभी तुजला वंदन
- कलाकार: Vivek Kajarekar, Vaibhav Kajarekar
- शीर्षक: कार्यारंभी तुजला वंदन
- Music Director: Vivek Kajarekar
- Year: 2003
- Album: My Compositions
- कालावधी: 0:06:15 minutes (8.38 MB)
- प्रकार: MP3 Stereo 44kHz
मी केलेली ही सर्वात पहिली संगीत रचना. ज्या गणरायाचं नामस्मरण कोणतंही कार्य करण्याच्या आधी केलं जातं, त्या गणरायावर लिहिलेली रचनाच माझ्या हातून प्रथम संगीतबध्द व्हावी आणि त्याचे शब्दही "कार्यारंभी तुजला वंदन" असेच असावे हा एक विलक्षण योगायोग होता. ठरवून केलेला प्रयत्न नव्हता. ही रचना करायचा योग कसा आला ते इथे वाचा. या वंदनेच्या गीतकार आहेत कुवेतच्या सौ. छाया आठवले ..........
कार्यारंभी तुजला वंदना गणराया आम्ही करतो हो
लक्ष ज्योतींचे दीप लावुनी स्वागत तुमचे करतो हो
छोटे मोठे प्रेक्षक श्रोते सेवा तुमची करतो हो
गणाधीशाचे आशिष घेऊन कार्यरंभ हे करतो हो
नृत्य गायनी प्रसन्न होऊनी गणराया तुम्ही रमता हो
टाळ मृदुंग चिपळ्या टिपर्या सूर ताल तुम्ही धरता हो
बालगीतातील बाल तुम्ही अन भावगीतातील भाव हो
भक्तीगीतातील भक्ती तुम्ही अन लोकगीतातील लोक हो
चला गाऊया चला नाचूया चला धरुया फेर हो
गणरायाला सवे घेऊनी मंगलमय हा खेळ हो
या रचनेमधे वापरण्यात आलेली तबला, पखवाज, झांज, सतार व सरोद ही सर्व वाद्यं मी स्वरशाला या संगणक प्रणालीचा वापर करुन वाजवलेली आहेत. म्हणजे प्रत्यक्षात एकही वाद्य नसताना केवळ संगणकाच्या आधारे केलेली ही रचना आहे. स्वरशाला या प्रणालीची मालकी स्वरसिस्टीम्स या एका स्वित्झर्लंड मधल्या कंपनीकडे आहे. त्यांच्या वाद्यप्रणालीचा वापर करुन केलेली ही रचना त्यांना नमुन्यादाखल पाठवली असता त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावरील स्वर कॅफे या विभागात या रचनेचा समवेश करुन माझा उत्साह द्विगुणीत केला
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य बना
- 207 reads
- 30 श्रवणे