माझ्या रचना

कार्यारंभी तुजला वंदन


0:06:15 minutes (8.38 MB)

मी केलेली ही सर्वात पहिली संगीत रचना. ज्या गणरायाचं नामस्मरण कोणतंही कार्य करण्याच्या आधी केलं जातं, त्या गणरायावर लिहिलेली रचनाच माझ्या हातून प्रथम संगीतबध्द व्हावी आणि त्याचे शब्दही "कार्यारंभी तुजला वंदन" असेच असावे हा एक विलक्षण योगायोग होता. ठरवून केलेला प्रयत्न नव्हता. ही रचना करायचा योग कसा आला ते इथे वाचा. या वंदनेच्या गीतकार आहेत कुवेतच्या सौ. छाया आठवले ..........

कार्यारंभी तुजला वंदना गणराया आम्ही करतो हो
लक्ष ज्योतींचे दीप लावुनी स्वागत तुमचे करतो हो

पत्रामध्ये काय लिहावे


0:04:49 minutes (5.68 MB)

मायबोली या संकेतस्थळाने २००८ मधे एक स्पर्धात्मक गझल कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात प्रथम पारितोषिक विजेत्या गझलेला संगीतबध्द करुन मायबोलीच्याच २००८ च्या दिवाळी अंकात स्थान देण्यात येईल असं अगोदरच जाहीर करण्यात आलं होतं. या स्पर्धेत प्रसाद मोकाशीच्या गझलेला प्रथम पारितोषिक मिळालं आणि ती गझल संगीतबद्ध करण्याचं काम माझ्याकडे आलं. अत्यंत कमी वेळ हातात होता पण दिवाळी अंक प्रकाशित करण्याची तारीख आधीच जाहिर झाली असल्याने उपलब्ध असलेल्या मर्यादित वेळेत मला ही रचना पूर्ण करावी लागली.

माकडाचा मोबाईल


0:05:08 minutes (5.65 MB)

माझा मित्र मिलिंद छत्रे याची ओळख होण्याआधी मी त्याच्या ब्लॉगला भेट दिली होती. त्याची विडंबनं तर मला आवडली होतीच (कारण ती नेहेमी मूळ गाण्याच्या मीटर चा आदर राखून केलेली असतात, पण त्याच्या एका मजेशीर बालगीताने मला भुरळ पाडली. त्यामुळे हे गाणं मी स्वरबद्ध करु शकतो का अशी विचारणा करण्याच्या बहाण्याने मिलिंदची ओळख करुन घेतली. आणि बालगीत या एका कठीण संगीत प्रकाराला हात घालायचं ठरवलं. मी स्वरबद्ध केलेलं हे पहिलंच बालगीत.

हे गजवदना


0:05:46 minutes (7.87 MB)

माझा मित्र प्रसाद शिरगांवकर (ज्याचा या संकेतस्थळाच्या उभारणीत मोलाचा वाटा आहे) याची ही एक प्रासादिक रचना. श्रवणासोबत गणरायाचं दर्शनही घ्यायचं असेल तर ही चित्रफीत पहा

हे गजवदना, हे गजवदना
शब्द - सुरांतून तुझी प्रार्थना

तू करुणेचा विशाल सागर
तू तेजाने भरले अंबर
तुच अग्नि, तू वायु, धरा अन
चराचरांतून तुझी चेतना

मूर्तरूप तू चैतन्याचे
धाम अकल्पित कैवल्याचे
श्वासांमधुनि, स्पंदांमधुनि
होत रहावी तुझी प्रार्थना

आनंदाचे गांव सदोदित
तुझ्या कृपेने हृदयी निर्मित
आनंदाच्या गावकर्‍यांची

Syndicate content